मराठी सिनेमाला ऑस्कर मिळायला हवे, हे तमाम मराठी सिनेमाप्रेमींनी उराशी बाळगलेले स्वप्न आहे. ते पूर्ण होईल तेव्हा होईल, पण एका मराठी माणसाला ऑस्कर मिळणे हे आता स्वप्न राहिलेले नाही. विकास साठ्ये या मुंबईच्या अभियंत्याने तांत्रिक विभागांसाठी देण्यात येणाऱ्या 'ऑस्कर'वर आपले नाव कोरले आहे. कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स येथे तेथील स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंटिफिक अँड टेक्निकल ऑस्कर २०१८ ऑस्कर सोहळा रंगला. या देण्यात आलेल्या कॅमेरा तंत्र पुरस्कारांमध्ये चार जणांच्या चमूची निवड झाली. 'शॉटोव्हर K1 कॅमेरा सिस्टीम' तंत्राचा सिनेमात यशस्वी वापर केल्याबद्दल या चौघांना ऑस्कर मिळाले आहे. या चौघांपैकी एक असणाऱ्या विकास साठ्ये यांनी हे कॅमेरा तंत्र विकसित केले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews